रविवार, १६ डिसेंबर, २०१८

aadhaar update आधार अद्यावत करतांना

                                                  आधार अपडेट करतांना 
ऑपरेटर नक्की सांगा खालील बाबी अपडेट करायला

१] आपला फोटो नवीन अपडेट करून घ्या फोटोत दोन्ही कान व चेहेरा सरळ यायला हवा फोटो घेताना पुरेश्या प्रकाशात घ्यायला सांगा .

२]  स्वतःच  नाव, वडिलाचे नाव , आडनाव .याचे मराठी अक्षरे व इंग्रजी स्पेलिंग नक्की चेक करून घ्या.

३] आपली जन्म तारीख पूर्ण उदा. ०१/०१/१९८०  अशी अपडेट करावी.

४] आधार वर आपला पत्ता अपडेट करतांना c/o म्हणून आपल्या वडिलाचे नाव वरील नावाप्रमाणेच हवे.गाव  
    .पोस्ट ऑफिस चे ठिकाण ,तालुका , जिल्हा  व्यवस्थित तपासून घ्यावा. 

५] आपला जवळच्या पोस्ट ऑफिसचा पिन कोड व्यवस्तीत टाकावा.

६] आपला नेहमीचा ( कायम ) वापरात असलेला मोबाईल नंब आधार अपडेट करतांना द्यावा.

७] आपला नेहमीचा ( कायम ) वापरात असलेला इमेल आय डी  आधार अपडेट करतांना द्यावा.


 आधार अपडेट करतांना सोबत लागणारी कागद पत्रे 
१] फोटो साठी स्वतः. टीप टाप असावे.

२] पत्ता साठी :- ग्रामसेवक यांची सही व ग्रामपंचायती चा शिक्का असलेला तसेच आपला पासपोर्ट फोटोवार
    गोल शिक्का असलेला रहिवाशी दाखला , किंवा शाळेचे ओळखपत्र किवा सरकारी नोकरीच्या ठीकानाचे  
   ओळखपत्र , शाळेचे बोनाफाईड , किंवा मतदान कार्ड ,
३] जन्मतारीख :- शाळेचे बोनाफाईड , किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सोडण्याचा दाखला
   
४] आपला मोबाईल नंबर 

६] आपला इमेल आय डी.अचूक 
 आधार बद्दल अजून माहिती साठी आधार च्या साईट ला भेट द्या . uidai ला goole वार सर्च करा .

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा